मुंबई (Mumbai) महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray)यांनी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचा ‘कानमंत्र’ देत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. “मुंबई (Mumbai)वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा,” असा स्पष्ट संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला.
मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मुंबई (Mumbai)वाचवण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांवर असल्याचे ठामपणे सांगितले. निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाण्याचे आवाहन करत त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
मेळाव्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgaonkar)यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ही निवडणूक मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जोमाने आणि पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा संदेश राज ठाकरे(Raj Thackeray)यांनी दिला आहे. सीट शेअरिंगमध्ये काही जागा येतात, काही जातात, त्यामुळे काहींना वाईट वाटणं स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच मनसे युतीमध्ये निवडणूक लढवत आहे. त्यामुळे युतीचा धर्म पाळणं आवश्यक आहे. प्रत्येक जागा ही मुंबईसाठी (Mumbai)महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी महत्त्वाची असल्याचे नांदगावकर यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक पक्षाच्या अस्तित्वाची असून सर्वस्व झोकून देऊन मुंबई वाचवायची आहे, असा संदेश राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे किती जागा लढवणार याबाबत मात्र पक्षाने गुप्तता पाळली आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतरच जागांची संख्या स्पष्ट होईल, असे नांदगावकर(Nandgaonkar)यांनी सांगितले. शेवटच्या क्षणापर्यंत किती जागा लढवायच्या आणि कोणाला उमेदवारी द्यायची, ही माहिती गुप्त ठेवण्याची रणनिती मनसेने आखली आहे.