राज्यातील सत्तासंघर्षावर आज फैसला? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

568 0

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सुनावणीत मिळणार आहेत. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे.

कोणत्या 16 आमदारांवर कारवाईची मागणी ?

  • एकनाथ शिंदे
  • अब्दुल सत्तार
  • तानाजी सामंत
  • यामिनी जाधव
  • संदिपान भुमरे
  • भरत गोगावले
  • संजय शिरसाट
  • लता सोनावणे
  • प्रकाश सुर्वे
  • बालाजी किणीकर
  • बालाजी कल्याणकर
  • अनिल बाबर
  • महेश शिंदे
  • संजय रायमुलकर
  • रमेश बोरनारे
  • चिमणराव पाटील
Share This News
error: Content is protected !!