उद्धव ठाकरेंच्या राहुल गांधींसमवेतच्या भेटीत महाविकास आघाडीचा जागा वाटपाचे सूत्र ठरलं? कोणता पक्ष किती लढवणार जागा

273 0

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यात होते. या दिल्ली दौऱ्यादरम्यान विधानसभेच्या जागावाटपास संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असून विधानसभेमध्ये काँग्रेस सर्वाधिक त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्ष जागा लढेल अशी माहिती मिळत आहे. या सोबतच विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षाचा वॉररुम एकच असणार आहे. तसेच एकच अजेंडा घेऊन महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार आहे. जनतेमध्ये तीन पक्षांत उत्तम एकजूट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रचारात महाविकास आघाडीतील नेते महत्वाच्या सभांमध्ये एकत्र असणार आहेत असा निर्णयही या बैठकीत झाला आहे

Share This News
error: Content is protected !!