P.N.Patil

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

640 6

कोल्हापूर : काँग्रेसचे पक्षाचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील (P. N. Patil Pass Away) यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. मृत्यूशी त्यांची सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी.एन. पाटील यांची ओळख राहिली.

रविवारी (19 मे 2024) सकाळी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपासून काही दिवसांपासून ते कमी रक्तदाबाच्या समस्येचाही सामना करत होते. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज (23 मे) सकाळी 10 वाजता आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे. सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!