Rahul Gandhi

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांनी केली तपासणी

555 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हॅलिकॉप्टरची तपासणी केली आहे. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. आज सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने निलगिरीत उतरले. यावेळी अचानक निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हॅलिकॉप्टपची तपासणी सुरु केली.

वायनाडमध्ये तिरंगी लढत
2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार के एनी राजा यांच्याशी होणार आहे. विशेष म्हणजे के एनी राजा हे INDIA आघाडीतील मित्र पक्षातले आहेत. याशिवाय वायनाड मतदारसंघात भाजपचे के सुरेंद्रन यांचंही राहुल गांधी यांना आव्हान आहे.

वायनाडमधून राहुल गांधीना का दिली उमेदवारी?
वायनाड आणि मलप्पुरम भागात काँग्रेस आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळेच गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने सातत्याने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत राहुलच्या वायनाड जिंकण्याच्या मार्गात फारशा अडचणी येणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी याच मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RCB आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी ठरणार का पात्र?

Pune News : खळबळजनक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Pune News : काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!