मुंबई: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जोरदार तयारी करत असून विषय रणनीती आखताना पाहायला मिळत आहे.
यातच आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्री जगत प्रताप अर्थात जे.पी. नड्डा मुंबईचा दौरा केला या मुंबई दौऱ्यात जेपी नड्डा यांनी लालबागच्या राजाचं दर्शनही घेतलं यासोबतच भाजपाच्या बड्या नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक देखील घेतली.
या बैठकीमध्ये जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेत्यांना काही सूचना देखील केल्या आहेत या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजपाचे निवडणूक संयोजक माजी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे भाजपाच्या व्यवस्थापन समितीच्या सामाजिक संपर्क समिती प्रमुख आणि विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते
जे.पी नड्डा यांनी भाजप नेत्यांना काय दिल्या सूचना?
★ शिवसेना आणि राष्ट्रवादीलासोबत घेऊनच निवडणूक लढा
★ बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांना विश्वासात घ्या
★ महायुतीत भाजपानं मोठ्या भावाची भूमिका निभावावी दोनही पक्षांना विश्वासात घ्यावं