दिलासादायक ! पुढील आर्थिक वर्षात करवाढ नाही

157 0

मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले मिळकत कर आणि करमणूक करांचे दर पुढील आर्थिक वर्षात ही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, उपलब्ध आर्थिक स्त्रोतांचा विचार करून अत्यावश्यक खर्च, प्रकल्पीय किंवा भांडवली खर्च यांचे आगामी वर्षासाठी नियोजन करावे लागते. त्यानुसार कराचे दर निश्चित करावे लागतात. महापालिका अधिनियमानुसार या दरांना दरवर्षी २० फेब्रुवारी पूर्वी मुख्य सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार आज करांचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रासने पुढे म्हणाले, १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मिळकतीचा पूर्ण कर भरणार्या मिळकतकरांना देण्यात येणार्या पाच किंवा दहा टक्के सवलती, गांडूळ खत प्रकल्प, सौरउर्जा प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजना राबविण्यार्या मिळकतकरधारकांना देण्यात येणार्या सवलती पुढील आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी किंवा माता, राष्ट्रपती पदक विजेते, माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी किंवा वीरपत्नींना राज्य शासनाच्या नियमांनुसार विविध प्रकारच्या करसवलती देण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेतील सध्याच्या मिळकती आणि नव्याने समाविष्ट गावांतील मिळकतीतून पुढील वर्षी दोन हजार ३३२ कोटी रुपयांचा अपेक्षित अंदाज करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022 0
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन…

” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…!” ट्विट करून समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी ; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - August 19, 2022 0
मुंबई : समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे . ” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…! ”…

#PUNE : खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट

Posted by - February 6, 2023 0
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 महिलांचा जागीच मृत्यू

Posted by - February 14, 2023 0
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण  अपघात झाला असून यामध्ये 5 महिलांचा जागीच मृत्यू, झाला आहे. तर 13 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.…
Khadakwasla Dam

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश

Posted by - April 4, 2024 0
पुणे : सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे उकाडा वाढत आहे तर दुसरीकडे धरणातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *