Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

345 0

मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इंदापूर सभेत केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
काही दिवसांपासून इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील ‘कचाकचा बटण दाबा’ अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल असं वक्तव्य केल होतं.‘कचाकचा बटण दाबा’ यावर राशपकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

आयोगाने काय दिले स्पष्टीकरण
निवडणूक आयोगाने केलेल्या प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव घेतलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे.त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही असे निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे. हा अहवाल त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News
error: Content is protected !!