आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

नवी दिशा नवा विचार ! छत्रपती संभाजीराजे पुण्यात स्पष्ट करणार भूमिका

पुणे- संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला. संभाजीराजे पुढे काय करणार ? असा सवाल उपस्थित होत असताना आता खुद्द त्यांनीच राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 12 मे रोजी पुण्यातून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गुरुवारी (दि 12 मे) दुपारी 12 वाजता संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे संभाजीराजे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की! स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.