CHAGAN BHUJABAL VS JARANGE PATIL : मोठी बातमी! छगन भुजबळ मैदानात, ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक; पडद्यामागे हालचालींना वेग

92 0

CHAGAN BHUJABAL VS JARANGE PATIL : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात(CHAGAN BHUJABAL VS JARANGE PATIL) केली आहे. त्यांची ठाम मागणी आहे की सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे. या मागणीमुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून राज्यातील राजकारणालाही वेग आला आहे.

सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. “आम्हाला फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवं,” या भूमिकेवर जरांगे ठाम राहिल्याने संघर्ष अधिक चिघळला आहे.

TOP NEWS MARATHI LIVE : सदावर्तेंची बायको घाबरली

जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी अस्वस्थ

जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरातील ओबीसी संघटना चळवळीत उतरू लागल्या आहेत. नागपूरमध्ये आधीच साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून, जालना जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून मोठं उपोषण सुरू होणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यासह अनेक संघटना या मुद्यावर सरकारला भिडण्याच्या तयारीत आहेत.

MANOJ JARANGE ON RAJ THACKERAY : “राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं” जरांगे पाटलांचा राज ठाकरेंवर घणाघाती प्रहार

छगन भुजबळांचा मैदानात प्रवेश

आजवर शांत असलेले मंत्री छगन भुजबळ याही घडामोडींमुळे आता सक्रिय झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक मुंबईत बोलावली आहे. या बैठकीसाठी १ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली असून, ओबीसी नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

नेमकी भूमिका काय असणार?

या बैठकीतून ओबीसी नेते कोणती भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास नेते एकमुखाने विरोध करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. पण या बैठकीतून आंदोलनाची हाकही दिली जाऊ शकते.

राज्याच्या राजकारणात या हालचालींमुळे तापमान वाढलं असून, मराठा आरक्षण – ओबीसी आरक्षण संघर्ष आता निर्णायक टप्प्याकडे जात असल्याचं स्पष्ट होत आहे.

Share This News
error: Content is protected !!