हिंगोली : सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी (OBC Melava) असं वातावरण निर्माण झालं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध करत राज्यभर मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. आज हिंगोलीत ओबीसी सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येणार आहे. यासाठी पहिला सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झाली, तर दुसरी सभा आज हिंगोलीत पार पडली आहे. या सभेला छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते देखील उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की तुमचा समाज पुढे आहे, म्हणून आमच्यावर बुलडोजर चालवू नका. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका. शिंदे समिती निर्माण केली ती रद्द करा. यांना अधिकार नाही. दोन महिन्यांत कुणबी नोंदीनुसार दिलेल्या प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करू नका. इतर समाजाचेही करा. त्यानुसार कसे कळेल, कोण पुढे आणि कोण मागे. मंडल आयोगाने सांगितले आम्ही 54 टक्के आहोत. सगळे म्हणतात जनगणना करा, मग करा ना. होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. बिहार करू शकतं तर महाराष्ट्र का नाही? जे होईल ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला लढायचे आहे, दूरपर्यंत लढायचे आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी यावेळी मांडली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?
Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या
Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान
Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा
Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे