chagan Bujbal

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

747 0

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यादरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?
आपण जरांगेंचं ऐकायला पाहिजे, आपण जर जरांगे यांचं ऐकलं नाही तर ते मोर्चा आणतील. असा खोचक टोला भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे. व्याह्याचे व्याही त्यांचे व्याही, सासू-सासऱ्यांचे मित्र व्यवसायिक भागिदार सर्वांना आरक्षण द्या. जरांगे म्हणतात तसाच जिआर काढला पाहिजे. मंत्र्यांना अंतरवाली सराटीमध्ये बंगले बांधून द्या कारण त्यांना तिथे वारंवार चर्चेसाठी जावं लागतं असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची 23 डिसेंबरला बीड शहरात पाटील मैदानावर इशारा सभा होणार आहे. सभेच्या स्थळावर तब्बल अकरा हजार झेंडे तर इतर ठिकाणी दहा हजार असे 21 हजार झेंडे या सभेसाठी लावण्यात आले आहेत. सभेची तयारी अंतीम टप्प्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. या सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!