ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ; 6 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.

कलम 153 (A) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर शिवसैनिकांकडून मुंबईतील खार परिसरात खासदार  राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.