CHANDRAKANT PATIL ON MARATAHA ARKSHAN : मराठा समाज ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत येऊ शकत नाहीत : चंद्रकांत पाटील

119 0

CHANDRAKANT PATIL ON MARATAHA ARKSHAN : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण पुन्हा पेटलेले असतानाच भाजप नेते चंद्रकांत पाटील (CHANDRAKANT PATIL ON MARATAHA ARKSHAN) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “मराठे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत. त्यांना कधीही दलित समाजाप्रमाणे अस्पृश्यतेचा सामना करावा लागलेला नाही. त्यामुळे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणे अशक्य आहे,” असे वक्तव्य त्यांनी शनिवारी केले.

*TOP NEWS MARATHI MANOJ JARANGE PATIL ANDOLAN THIRD DAY : न्यायालयासमोर मराठा आंदोलकांची आंघोळ

आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर विधान

सध्या मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असताना सरकारच्या पातळीवर हालचाली वेग घेत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आंदोलकांवर नाराजी व्यक्त करत मुंबईकरांना त्रास देणे चुकीचे असल्याचे म्हटले.

MARATHA ARAKSHAN : 2024 ला आंदोलन झालंच होतं की..! मनोज जारांगे-पाटील पुन्हा मैदानात का?

कायदेशीर अडचणींचा मुद्दा

पाटील यांच्या मते, ज्यांना कुणबी दाखला मिळतो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ मिळतो. यामुळे हजारो कुटुंबांना आधीपासूनच सोय होत आहे. अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण देणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. “आज काही मागण्या मान्य झाल्या तरी त्या न्यायालयात टिकणार नाहीत,” असे ते म्हणाले.

त्यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. “ते चार वेळा मुख्यमंत्री होते. तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण का दिले नाही? हे आंदोलन वेळ मारून नेण्यासाठीच आहे. तामिळनाडूतील प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि तेथेही ते टिकेलच असे नाही,” असे ते म्हणाले.

फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यावर टिप्पणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत आहेत, मात्र त्यांची कुणाशी तुलना होऊ नये असेही पाटील म्हणाले. अजित पवार थेट बोलतात, तर फडणवीस संयम ठेवतात, असा त्यांचा उल्लेख होता.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर भाष्य करताना त्यांनी कोणाचे नाव न घेता, “काही लोक खोटे बोलूनही सतत रेटून बोलतात,” असा टोला लगावला.

“EWS हेच खरं मराठा आरक्षण”

पाटील यांनी पुढे म्हटले की, “EWS आरक्षण हीच खरी मराठा समाजासाठीची संधी आहे. कारण मराठे मागास नाहीत. ओबीसीमध्ये समावेश करून राजकीय आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न हा केवळ आगामी निवडणुकांसाठीचा डाव आहे.”

त्यांनी हेही स्पष्ट केले की, समाज मागास आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त मागासवर्गीय आयोगाकडे आहे; कोणत्याही समितीला तो अधिकार नाही.

Share This News
error: Content is protected !!