CHANDRAHAR PATIL POLITICAL JOURNEY: कुस्तीचं मैदान गाजविणारे चंद्रहार पाटील करणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; कशी आहे राजकीय कारकिर्द?

CHANDRAHAR PATIL POLITICAL JOURNEY: कुस्तीचं मैदान गाजविणारे चंद्रहार पाटील करणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; कशी आहे राजकीय कारकिर्द?

87 0

CHANDRAHAR PATIL POLITICAL JOURNEY: नाही नाही म्हणता आज अखेर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या चंद्रहार पाटलाची राजकीय मैदानावरील कारकिर्द कशी आहे.

WHO IS DOUBLE MAHARASHTRA KESARI CHANDRAHAR PATIL| चंद्रहार पाटील करणार शिवसेनेत प्रवेश

2007 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहिल्यांदा चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

2008 मध्ये सांगलीत झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकवत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान चंद्रहार पाटलांनी मिळवला.

2008 मध्ये चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत या निवडणुकीत विजय मिळवला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 11 मार्च 2024 रोजी चंद्रहार पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

पक्षप्रवेशावेळीच चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेसाठीची उमेदवारी निश्चित झाली होती.

DOUBLE MAHARASHTRA KESARI CHANDRAHAR PATIL | चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

चंद्रहार पाटलांचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आणि पर्यायानं महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती.

त्यानंतर सांगलीची जागा ही महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय संपादित केला.

#SANGALI : भाजप माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणात भाजप माजी नगरसेवकाचा हात; चार जण ताब्यात

या निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील अशी तिहेरी लढत झाली होती.
या तिहेरी लढतीत विशाल पाटील यांना 5 लाख 71 हजार 666, संजय काका पाटील यांना 4 लाख 71 हजार 613 तर चंद्रहार पाटील यांना अवघी 60 हजार 860 मतं मिळाली होती.

यानंतर राज्य संघटक म्हणून चंद्रहार पाटील यांची ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवड करण्यात आली होती

मात्र ते पक्षात फारसे सक्रिय दिसले नाहीत. मागील अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटलांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.

Vishal Patil : चर्चेतील चेहरा : विशाल पाटील

Share This News
error: Content is protected !!