देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागा मिळाल्या असून 9 जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत… मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्रातून कोणते खासदार मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात पाहुयात TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT मध्ये….
महाराष्ट्रात महायुतीला 18 जागांवर यश मिळवता आलं असून भाजपाला 9 जागांवर विजय मिळवता आहे. तर शिंदेंची शिवसेना 7 जागी तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागावर विजय मिळवता आला आहे. आता मोदी 3.0 महाराष्ट्रातून भाजपाकडून कोण मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतं
नितीन गडकरी: मोदी 3.0 मध्ये भाजपाकडून शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने नाव येतं ते नितीन गडकरी यांचं नागपूर मधून सलग तिसऱ्यांदा नितीन गडकरी हे विजयी झाले असून मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळामध्ये नितीन गडकरी यांनी मंत्रिपद सांभाळला आहे रस्ते विकासामध्ये भरीव असे योगदान असलेले गडकरी हे भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते आहेत त्यामुळे तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.
नारायण राणे: रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विजयी झालेले नारायण राणे हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून याअगोदर देखील मोदी सरकारमध्ये नारायण राणे यांनी केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं असून पुन्हा एकदा नारायण राणे यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते…
रक्षा खडसे: जळगाव जिल्ह्याच्या रावेर मधून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असून त्यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले: सातारा लोकसभेतून विजयी झालेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचीही केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असून उदयनराजेंच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
अनुप धोत्रे: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव असणारे अनुप धोत्रे हे पहिल्यांदाच अकोला लोकसभेतून विजयी झाले असून मोदी 3.0 मध्ये युवा आणि तरुण चेहरा म्हणून अनुप धोत्रे यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते.
भाजपानंतर आता शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून कुणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते हे पाहूया
प्रतापराव जाधव: बुलढाणा लोकसभेतून चौथ्यांदा विजयी झालेले प्रतापराव जाधव हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असून शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे…
श्रीरंग बारणे: मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या श्रीरंग बारणे यांचीही केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
श्रीकांत शिंदे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असणारे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात…
सुनील तटकरे: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयी झालेले एकमेव उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याच्या चर्चा सुरू झाल्यात.
प्रफुल पटेल: राज्यसभेचे खासदार असणारे प्रफुल्ल पटेल यांचीही मोदीत 3.0 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अनेक वर्ष दिल्लीतील कामाचा अनुभव असलेल्या पटेल यांना सुनील तटकरे यांच्या ऐवजी संधी दिली जाऊ शकते.
एकंदरीतच मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्रातील या चेहऱ्यांना संधी दिले जाते की धक्का तंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना समोर केलं जात हे पहाणं महत्त्वाचं असणार आहे…