Murlidhar mohol

पुण्याला मिळणार मंत्रिपदाची संधी; मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन

448 0

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आज एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ संपन्न होत असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्यासह 50 ते 55 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून मंत्रिपदासाठी फोन केला गेला असल्याची माहिती आता मिळत असून मुरलीधर मोहोळ यांच्या रूपान पुण्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

या अगोदर यूपीए सरकारमध्ये सुरेश कलमाडी हे पुण्याचे खासदार असताना त्यांनी रेल्वे आणि क्रीडा खात्याचा कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं होतं त्यानंतर प्रकाश जावडेकर हे देखील राज्यसभेवर असताना केंद्रीय माहिती प्रसारण खात्याचा मंत्रीपद जावडेकरांनी भूषवलं होतं. कलमाडी आणि जावडेकरांनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने आता तिसऱ्यांदा पुण्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!