विदर्भ: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नवनिर्माण यात्रा सध्या विदर्भात असून या विदर्भ दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
याआधी मनसे कडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती ज्यामध्ये शिवडी मतदार संघातून माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना तर लातूर ग्रामीण मतदार संघातून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.
तर आज राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली असून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी मिळाली आहे. चंद्रपूर मतदार संघात सध्या किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार आहेत तर राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष धोटे हे काँग्रेसचे आमदार आहेत
मनसेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर 225 ते 250 जागांची चाचपणी केल्यानंतर आतापर्यंत एकूण पाच मतदार संघात मनसेने उमेदवारांची घोषणा केली आहे