आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणव्हिडिओ

मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं

नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज अखेरशिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे

त्यामुळे आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही.शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही

नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय देण्याच्या सूचना देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची कागदपत्रे तपासल्यानंतर आज जवळपास आयोगाची चार तास बैठक झाली. त्यानंतर आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या आधी चिन्हावर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिंदे गटाने निवडणुक आयोगाकडे केली होती.