उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजपने बहुमतांचा आकडा पार केला असून विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
याच पार्श्वभूमीवर देशासह आज पुणे शहर भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये जलोषाचं वातावरण पाहायला मिळालंय.पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भाजप सर्व राज्यांमध्ये आपला ठसा उमटवेल असं मत व्यक्त केलं आहे.