आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणसुपरफास्ट

भाजपची राज्यसभेची यादी जाहीर; महाराष्ट्रातून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी

भाजपकडून राज्यसभेसाठी दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.