भाजपाचे मिशन दक्षिण भारत; राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांमध्ये चारही नावं दक्षिण भारतातील

306 0

नवी दिल्ली:राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली असून ही चारही नावं दक्षिण भारतातली आहेत.

धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीचे वडील आणि बाहुबली, बजरंगी भाईजानचे कथालेखक आहेत.

Share This News
error: Content is protected !!