विधान परिषद निवडणूक: भाजपाचे अमित गोरखे विजयी

256 0

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजपाचे अमित गोरखे विजयी झाले आहेत. आतापर्यंत भाजपाच्या चार उमेदवारांचा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला असून पिंपरी चिंचवड मधील अमित गोरखे यांनाही विधानपरिषद निवडणुकीमध्ये विजय मिळाला आहे.

कोण आहेत आहेत अमित गोरखे

मूळ गाव श्रीगोंदा, अहिल्यानगर

पिंपरी चिंचवडला गेल्या 40 वर्षापासून रहिवासी

अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष

एम ए (सोशॉलॉजी) ,एमबीए (एच आर)पर्यंतचे उच्च शिक्षण

पिंपरी चिंचवड क्षेत्रात नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात भरघोस काम

अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते २०१४

राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला सन्मान

राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाशी लहानपणापासूनची नाळ

प्रथम वर्ग शिक्षित

न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदासाठीचे नॉमिनेशन असा प्रवास

अत्यंत गरिबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा नेतृत्व

भाजपाकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी सध्याची जबाबदारी

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या गैर व्यवहारानंतर चार महिन्याच्या कालावधीमध्ये महामंडळ स्थिरस्थावर करण्याचे काम त्यांनी केले पण कालावधी फक्त चार महिन्याचा मिळाला.

Share This News
error: Content is protected !!