ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

मोठी बातमी! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माघार घेतली असून ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली.

ही निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार होता. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून या निवडणुकीत मुरजी पटेल  यांना उमेदवारी देण्यात आली होती , तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे