दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांसाठी आज मतमोजणी होत असून प्राथमिक कलानुसार सध्या भाजपा बहुमताच्या पुढे गेल्याचा पाहायला मिळत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपा 43 जागांवर तर आम आदमी पक्षात अवघ्या 27 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

बहुतांश एक्झिट पोलनुसार दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता जात बहुमतात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
