राज्यसभेपेक्षा अधिक मतांनी भाजपा निवडून येईल; अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

199 0

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले होते.  बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेले याची चर्चा होत होती. अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली असून भाजप उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक मतं घेऊन आमदार बनणार, असा विश्वास बावनकुळे व्यक्त केला.

फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वांसाठी उपलब्ध असायचे. आताचे मुख्यमंत्री कुठे असतात, कोणाला भेटतात. यामुळे आमदारच त्याचा बदला घेतील असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंच्या या प्रतिक्रियेमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!