BJP VS SHIVSENA: स्वातंत्र्यदिनाची यादी आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी! मंत्री भरत गोगावले, दादा भुसे नाराज; भाजप-शिवसेनेत नेमकं चाललंय काय?

120 0

BJP VS SHIVSENA: राज्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झालेला असतानांचं

आता स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या यादीमुळे हा वाद आणखी चिघळला आहे.

रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात

आल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजी (BJP VS SHIVSENA) उफाळल्याचं पाहायला मिळालं

VIDEO NEWS: BJP VS SHIVSENA:स्वातंत्र्यदिनाची यादी आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.

रायगड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरु आहे,

तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे आमने-सामने आहेत.

पालकमंत्री पदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्यदिनी

कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सोमवारी जाहीर केली.

या यादीनुसार, रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रायगडमधून अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानं मंत्री भरत गोगावले यांची नाराजी सुरु झाली.

याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीलाही मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली.

SHRIMANT DAGDUSHETH GANPATI BELGIUM: बाप्पा मोरया रे…;श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची बेल्जियममध्ये होणार प्रतिष्ठापना

पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसला तरीही ध्वजरोहणासाठीचा मान यंदा भरत गोगावले यांना मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेची होती.

मी कौटुंबिक कारणाने बाहेर आहे त्यामुळे कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिलं.

तरीसुद्धा यामागे मान अपमान नाट्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

KHED KUNDESHWAR NEWS: कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला;9 जणांचा मृत्यू 25 जण जखमी

ही यादी पालकमंत्री पदाची नाही तर कोणत्या जिल्ह्यात कुणी ध्वजारोहन करावं याची आहे असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

तर नाशिक जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री गिरीश महाजन यांना मिळाला.. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

याबाबत प्रतिक्रिया देताना दादा भुसे म्हणाले हा निर्णय घेण्याचा सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असतो

त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं पालन करणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे.

दादा भुसेंनी स्पष्टीकरण दिल असत तरीही भुसे हे सध्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

राज्यातल्या सत्ताधाऱ्यांमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून सुरू

असलेला हा वाद, स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाच्या निमित्तानेही

रंगताना पाहायला मिळतोय.

Share This News
error: Content is protected !!