हरियाणात भाजपा बहुमताकडे तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस, ‘नॅशनल कॉन्फरन्स’ची सत्ता स्थापनेकडे वाटचाल; काय आहे सध्याची आकडेवारी? 

191 0

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देशात हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निकालाकडं सर्वांचेच लक्ष लागलं होतं.

आज सकाळी सुरुवातीच्या प्राथमिक कला मध्ये हरियाणात काँग्रेस आघाडीवर होतं मात्र नंतर डाव पलटला आणि भाजपाने आघाडी मिळवली दुपारी एक वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार हरियाणा 48 जागांवर भाजपा 36 जागांवर काँग्रेस तर इतर पक्ष सहा जागांवर आघाडीवर आहेत.

तर जम्मू काश्मीरमध्ये दुपारी एक वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपा केवळ 28 जागांवर तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे मेहबूबा मुफ्ती यांच्या ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ अर्थात ‘पीडीपी’ला अवघ्या दोन जागी आघाडी मिळाली असून इतर पक्ष आठ जागांवर आघाडीवर आहेत.

हरियाणा, जम्मू-काश्मीरमधील पहिला निकाल हाती

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधला पहिला निकाल हाती आला असून जम्मू-काश्मीरमध्ये हजरतबलपूर या विधानसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे सलमान सागर विजयी झाले आहेत त्यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवाराचा पराभव केलाय तर हरियाणाच्या नूंह मतदारसंघातून काँग्रेसचे अफताब अहमद विजयी झालेत

Share This News
error: Content is protected !!