आपला महाराष्ट्रराजकारण

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्यजित कदम यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

तसेच राहुल चिकोडे, धनंजय महाडिक आणि महेश जाधव यांच्यावर पोटनिवणुकीसाठी विशेष जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.