विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी

312 0

राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून त्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आज राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती दिली असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.

राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. असे असताना त्यांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत. सध्या ते विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले आहेत.

शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे.

भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधान सभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.

Share This News
error: Content is protected !!