आपला महाराष्ट्रराजकारण

विधानसभेसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती; कोणत्या नेत्यांचा झाला समितीत समावेश?

लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व जालनाचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वात व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे या समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून असणार आहेत.

कशी असणार भाजपाची व्यवस्थापन समिती?

रावसाहेब पाटील दानवे – अध्यक्ष

दिलीप कांबळे –  संयोजक

अशोक नेते, श्रीकांत भारतीय – सहसंयोजक

सुधीर मुनगंटीवार – जाहीरनामा समिती

चंद्रकांत पाटील – विशेष संपर्क समिती

पंकजा मुंडे – सामाजिक संपर्क समिती

विजया रहाटकर – महिला संपर्क समिती

अशोक चव्हाण – कृषी क्षेत्र संपर्क समिती

राधाकृष्ण विखे पाटील – लाभार्थी संपर्क समिती

रक्षा खडसे – युवा संपर्क समिती

रवींद्र चव्हाण – प्रचार यंत्रणा समिती

प्रवीण दरेकर – सहकार क्षेत्र संपर्क समिती

विजय उर्फ भाई गिरकर – अनुसूचित जाती संपर्क समिती

विजयकुमार गावित – अनुसूचित जमाती संपर्क समिती

निरंजन डावखरे – सोशल मीडिया व आयटी

अतुल भातखळकर – माध्यम समन्वय

गिरीश महाजन – महायुती निवडणूक अभियान समन्वयक

मुरलीधर मोहोळ – ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्कप्रमुख

किरीट सोमय्या – निवडणूक संपर्कप्रमुख

विशेष निमंत्रित सदस्य

  • नितीन गडकरी
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • देवेंद्र फडणवीस
  • पियुष गोयल
  • विनोद तावडे
  • आशिष शेलार
  • नारायण राणे
  • हंसराज अहिर
  • गणेश नाईक

पदसिद्ध सदस्य 

  • रणधीर सावरकर
  • विक्रांत पाटील
  • माधवीताई नाईक
  • विजय चौधरी
  • संजय केनेकर