पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर आता पक्षाने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी तर गुजरातच्या केतन भाई पटेल यांची उपाध्यपदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय सहकारी संघ देशभरातील, साखर उद्योगाच्या अडचणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करत असते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट