आम्ही कमी पडलो तरी चालेल पण खोटे बोलणार नाही, खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडूण येणार हे नक्की असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीनं संबोधित केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “महापुरानंतर मी आणि फडणवीस एकाच ठिकाणी पाहणी केली, आम्ही काय केलं, काय नाही ते जनतेसमोर होऊ दे म्हणून गेलो. बेंबीच्या देटापासून भाजपवाले ओरडून सांगत होते, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. 2014 साली समझोता होत असताना अचानक युती तोडली, 2019 साली युतीत असताना भाजपची 40 हजार मतं कुठं गेली? गेल्या वेळी तुम्ही छुप्या पद्धतीने काँग्रेसला मदत केली होती की नाही सांगा.”
https://t.co/yGYV4yrVyL
TOP NEWS MARATHI : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद #Live#uddhavThackeray #cm #kolhapaur #shivsena #topnewsmarathi #topnewsmarathilive— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) April 10, 2022