Election

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

502 0

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे (Election) कल हाती यायला सुरुवात झाली आहे. या चारही राज्यांमधील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातही राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या तिन्ही राज्यात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार कलही हाती येत आहे. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

पहिल्या कलानुसार मध्यप्रदेशात भाजप 155 तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानात भाजप 98 आणि काँग्रेस 76 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 43 आणि भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणातही काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 65 तर सत्ताधारी बीआरएसला 45 जागा मिळताना दिसत आहे. भाजप आणि एमआयएम प्रत्येकी 4 जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, राजस्थान आणि मध्यप्रदेशात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. या दोन्ही राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना काही आमदार कमी पडण्याची शक्यता आहे. अशावेळी आमदारांची फोडाफोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संभाव्य आमदारांना घोडेबाजारापासून वाचवण्यासाठी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसने सर्व उमेदवारांना जयपूर येथे एकत्र जमा होण्याचे आदेश दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!