सामना वर्तमानपत्राच्या विरोधात भाजपा आक्रमक

521 0

सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले की, देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

भाजपा चांगलाच आक्रमक झाला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामना विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सामना वृत्तपत्राच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहोत. मुंबईचे नेते आणि कार्यकर्त्यांचा, सामना वृत्तपत्राच्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा विचार सुरु आहे. दोन्ही प्रकारच्या लढाईची आमची तयारी सुरु आहे. स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन जे लिहिलं जातंय. ते खपू घेण्यासारखं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

उद्धव ठाकरेंना जे बोलायचं असतं, ते सामनातून आणि संजय राऊतांच्या माध्यमातून बोलतात. सामनातून जी टीका झाली ते उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन आहे. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचं डोकं काम करत नाही. ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं. राष्ट्रवादी भाजपसोबत आली आहे. आता ते सत्तेत येऊ शकत नाही हे त्यांचं दु:ख आहे. देवेंद्रजींच्या पाठीत खंजिर खुपसून जी चूक केली. ती लक्षात येत आहे. म्हणून यापद्धतीने आपल्या मुखपत्रातून टीका करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!