ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी

मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली असून संजय राऊत यांना ईडी कडून तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक रविवारी (ता.31 जुलै) सकाळी 7 वाजता दाखल झालं होतं.

तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यानंतर रात्री उशीर राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली.

संजय राऊत यांना आज सकाळी साडेनऊ वाजता जे.जे.रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं असून दुपारी दीड वाजता संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.