मोठी बातमी! मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात 

382 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत असून याच मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जर मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर त्याच ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केला आहे.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात निगडी येथे हनुमान चालीसा लावण्यासाठी भोंगे लावत असताना मनसेचे पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव नगरसेवक आणि शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधान सभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे यांना पिंपरी-चिंचवड पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे

कारवाईच्या भीतीने अनेक मनसे कार्यकर्ता सैरावैरा धावत असल्याचे चित्र देखील पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!