Uddhav Thackeray

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला

869 0

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लढवली. आता भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे या मतदारसंघावर रामदास आठवले यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!