शिवसेनेला मोठा धक्का! राष्ट्रवादीवर आरोप करत ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

226 0

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. याचदरम्यान, आता ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…!

नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटमध्ये तसेच उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा.. जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…! त्यामुळे शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!, असे स्पष्ट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!