पुणे भाजपाला मोठा धक्का; पाच मोठ्या नेत्यांनी धरली शरद पवार गटाची वाट

121 0

ऐन विधानसभेच्या काळात अनेक पक्षांमध्ये इन्कमिंग आउटगोइंग सुरू आहे. पुण्यातही शरद पवार गटात असंच इन्कमिंग झालं असून ज्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी या भागातील पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ज्याचा फटका भाजपला निवडणुकीच्या मतदानावर बसू शकतो.

5 जणांचा पक्षप्रवेश

वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे, त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे, संमित्रहडपसर मतदार संघातील सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशा बरोबरच त्यांनी आपापल्या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

रायगडमध्येही पक्षप्रवेश

पुण्यासह रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रवेश होत असल्याने याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!