Beed News : गोट्या गित्तेने मुंबईत रेकी करून जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याचा रचला कट? – विजयसिंह बांगरांचा आरोप

54 0

Beed News : राजकारणात गोंधळ माजवणाऱ्या आरोपांनी पुन्हा एकदा बीड जिल्हा आणि परळी भागात खळबळ उडाली आहे. विजयसिंह बांगर यांनी केलेल्या एका गंभीर आरोपाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोट्या गित्ते या युवकाने, तांदळे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसह, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने मुंबईत रेकी केली होती.

TOP NEWS MARATHI : ‘किती जणांबरोबर झो? तुम्ही ‘म, मां* च्या मुली असल्याच’!कोथरूड पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा मुलींचा आरोप*

हा आरोप इतक्यावरच थांबत नाही. बांगर यांनी असेही म्हटले आहे की, गोट्या गित्ते मागील काही दिवसांपासून सतत आव्हाड यांना धमक्या देत आहे. विशेष म्हणजे, खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीही गोट्या गित्तेकडून धमक्या आल्याचे यापूर्वी जाहीरपणे सांगितले आहे. गित्तेला वाल्मिक कराडचा निकटवर्तीय मानले जाते.
महादेव मुंडे खून प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या बीडमध्ये, हे नवे वक्तव्य वातावरण अधिक तापवणारे ठरले आहे. बांगर यांनी याआधीही या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा सहभाग असल्याचा दावा करून काही पुरावेही समोर आणले होते. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष घालून पोलीस यंत्रणेकडून कारवाईची गती वाढवली होती.

सध्या गोट्या गित्ते फरार असून त्याचा शोध बीड पोलीस घेत आहेत. दरम्यान, त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला, जो १६ जानेवारीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत गित्तेने वाल्मिक कराडला आपले “दैवत” म्हटले आहे.विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा गित्तेविरुद्ध गंभीर आरोप केले. “गोट्या गित्ते हा विकृत मानसिकतेचा गुन्हेगार असून अनेक खून प्रकरणांशी त्याचा संबंध आहे. परळी पोलिसांनी अद्याप त्याला अटक न केल्यामुळे तो खुलेआम व्हिडीओद्वारे लोकप्रतिनिधींना धमकावत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

Pune News : कोथरुड पोलिसांच्या चौकशीत तरुणींना जातीवाचक शिवीगाळ? सुप्रिया सुळे आक्रमक

तसेच, पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. “लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची वाट पाहायची का?” असा सवाल उपस्थित करत, त्यांनी गोट्या गित्ते आणि तांदळे या दोघांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली.जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्यावर असलेल्या संभाव्य हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. “गित्ते एक नामांकित गुंड असून मला धमकावत आहे, पण मी घाबरणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Share This News
error: Content is protected !!