बीड : देशातील चौथ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. यामध्ये राज्यातील 11 जागांवरती मतदान झाले. मात्र यापैकी सर्वात जास्त हाय व्होल्टेज लढत ही बीड लोकसभा (Beed News) मतदारसंघात पाहायला मिळाली. बीडमध्ये तब्बल 72 टक्के मतदान झाले. राज्यात आत्तापर्यंत झालेल्या मतदानापैकी हे सर्वाधिक मतदान आहे. मात्र हे मतदान होत असताना इतरही अनेक गोष्टी घडल्या.
बीडमध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे व महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि वंचितकडून अशोक हिंगे हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. मात्र या जागेसाठी मुंडे व सोनवणे यांच्यातच थेट लढत होणार आहे. बीडमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत 68 टक्के मतदान झाले होते. मात्र यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने बराच वेळ मतदान प्रक्रिया सुरू राहिली. त्यामुळे या जागेवर तब्बल 72 टक्के मतदान झाले.
दिवसभरात बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने मशीन बंद पडण्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे 18 ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी थोडा वेळासाठी मतदान बंद होते. या सगळ्यामुळे काही मतदान केंद्रांवर रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदान पार पडले. आणि या शेवटच्या तासाभरात 5 ते साडेपाच टक्के मतदान झाले. मात्र काही मतदान केंद्रांवर गोंधळही झाला. काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे प्रकारही समोर आल्याने या बोगस मतांमुळे मतदानाचा टक्का वाढण्याचा आरोप करण्यात येत आहे. तर बजरंग सोनावणे यांनी फेर मतदान घेण्याची मागणी ही केली आहे.
मराठा VS ओबीसी
मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा मतदानाच्या अग्रस्थानी राहणार आहे. याचाच परिणाम बीडमध्येही दिसून येऊ शकतो. पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे ओबीसी मतं त्यांच्या पारड्यात पडतील पण मराठा मतांचा फटका त्यांना बसू शकतो. त्यातच जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली. ज्या त्यांची सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मराठा मतं सोनावणे यांच्या पारड्यात पडतील, अशी शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा