Vijay Shivtare

अखेर बंड शमलं; विजय शिवतारे यांची बारामती लोकसभेतून माघार

4395 0

सासवड: विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या निर्णयाचा फायदा बाकीचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंना होणार आहे. बारामातीतून निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला होता.

मात्र या निर्णया नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत विजय शिवतारेंची मुंबईत बैठक पार पडल्यानंतर शिवतारेंचं बंड थंड होणार का अशी जोरदार चर्चा राजकारणाच्या वर्तुळात सुरु होती.

मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुनेत्रा वार यांना फायदा होणार असल्याचा बोललं जात असून बारामती लोकसभेत होणाऱ्या ननंद वर्सेस भाऊजाई या लढतीत कोण बाजी मारत हे पहाणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!