सुनील शेळके यांची उमेदवारी जाहीर होताच मावळमध्ये भाजपाला खिंडार; माजी मंत्री बाळा भेगडे यांची भाजपाला सोडचिठ्ठी

186 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्ष तयारी करत आहेत.  नुकतीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

या यादीमध्ये स्वतः अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

यामध्ये मावळ मधून पुन्हा एकदा सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आल्याने मावळ भाजपामध्ये खिंडार पडला आहे. अगोदर प्रदेश उपाध्यक्ष असणाऱ्या बापूसाहेब भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उभ राहण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी देखील पक्षाला सोडचिट्टी देत बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!