Bachchu Kadu

…तर विधानसभा निवडणूक लढणार नाही; आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा

2265 0

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना माजी शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे संस्थापक अध्यक्ष अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली असून बच्चू कडू यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय…

सध्या मी महायुती बरोबर नाही आमची तिसरी आघाडी देखील नाही येत्या 19 तारखेला आम्ही महायुतीला एक निवेदन देणार आहोत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर अचलपूर विधानसभेची जागा महायुतीला देऊन मी निवडणूक लढणार नाही अशी घोषणाच बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याच्या केलेल्या घोषणेवरून आता सत्ताधारी महायुती नेमकी काय भूमिका घेते आणि बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!