मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणं अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांना चांगलंच महागात पडले आहे. अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. बारस्कर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू ऊर्फ महेंद्र जवंजाळ यांनी एक निवेदन काढून ही माहिती दिली आहे. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत जी भूमिका मांडली त्याचं प्रहार जनशक्ती पक्ष समर्थन करत नाही. किंवा प्रहार वारकरी संघटनाही समर्थन करत नाही. किंवा आमचा या विधानाशी काहीच संबंध नाही. अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीच संबंध राहणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
अजय महाराज बारस्कर यांनी काय केले आरोप?
जरांगे हेकेखोर माणूस आहे.रोज पलटी मारतात. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही. लोणावळा आणि वाशीत अधिका-यांसोबत गुप्त बैठका घेतल्या. जरांगे सरकारला निवेदन देत नाहीत असे गंभीर आरोप बारसकर यांनी केले आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेने उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठा जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला. जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर JCB फुले उधळणारे लोक आले कुठून? यांना पैसे कोण देतं असे सवाल बारसकर यांनी यावेळी उपस्थित केले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात
Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन
Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू
Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग
Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त
Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी
Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन