AZAD MAIDAN : मराठ्यांचं वादळ आझाद मैदानावर धडकणार, आझाद मैदानाचा नेमका इतिहास काय?

79 0

AZAD MAIDAN : मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन सध्या चर्चेचा विषय आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत मराठ्यांचा वादळ (AZAD MAIDAN) 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार आहे. आंदोलन मोर्चे सभा अशा प्रसंगांमध्ये आझाद मैदानाचे नाव मात्र आवर्जून घेतलं जातं नेमकं काय आहे आझाद मैदानाचा इतिहास चला जाणून घेऊयात

“म” मराठीच्या जयघोषाने 11 गणेश मंडळाचे संयुक्त मिरवणूक

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन जवळ 25 एकर म्हणजे जवळपास दहा हेक्टर जमिनीवर भव्य असं असलेलं मैदान म्हणजेच “आझाद मैदान” खरंतर मुंबईतलं आझाद मैदान हे आंदोलनांपासून कधी आझाद झालंच नाही. अनेक खेळ, सभा, जत्रा-यात्रा, आंदोलन, उपोषणं,भाषणं, गाजली ती या मैदानावरच… मुंबई, जिथं राज्याची सत्ता,आर्थिक समीकरणं ठरतात. समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, हाकेच्या अंतरावर हायकोर्ट, सगळी कार्यालय आणि सगळी मुंबई आणि महाराष्ट्रात चालवणाऱ्या (AZAD MAIDAN) मंत्रालय विधानसभेच्या अगदी जवळ असणारं हे मैदान… अशा जागेवर असलेलं हे मैदान राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घ्यायला आपल्या मागण्या मांडायला आणि प्रवासासाठी सुद्धा सोयीस्कर आहे. अगदी रस्ता ओलांडला की रेल्वेने भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठीचा स्वस्त मार्ग उपलब्ध होतो. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी हे सोपं ठिकाण.
हे केवळ मैदान नाही तर हा मोठा इतिहास आहे. या मैदानाचा इतिहास जाणून घेण्यासाठी थोडसं भूतकाळात जाउयात… 1857 च्या बंडात मुंबईतील दोन सैनिकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं ती हीच जागा.
ब्रिटिशांच्या काळात आझाद मैदान हे “बॉम्बे जिमखाना मैदान” म्हणून ओळखलं जायचं. इंग्रज सुद्धा या मैदानावर क्रिकेट, हॉकी आणि इतर खेळ खेळायचे. आझाद मैदान हे 1942 च्या क्रांतीच्या स्मृतीच प्रतिक आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी गवालिया टॅंक मैदानातून भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली त्यावेळी त्यांनी “करो या मरो” चा संदेश दिला. या घोषणे नंतर भारतभर क्रांतीची लाट उसळली. यानंतर आझाद मैदानात अनेक सभा घेतल्या गेल्या. जिथे लोकांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले गेले. महात्मा गांधींसह सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू आणि इतर नेते या ठिकाणी आले आणि त्यांनी लोकांना स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षात भाग घेण्यासाठी आवाहन इथूनच केलं. तेव्हा आझाद मैदान म्हणजे सामान्य लोकांसाठी ब्रिटिशांच्या विरोधातल्या चळवळीचं मुख्य ठिकाण झालं होतं. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा हा आझाद मैदानातच झाला होता. सार्वजनिक मैदानावर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

TOP NEWS MARATHI: पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून आंदोलनात ‘ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पोळ यांचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा’

आझाद मैदान हे विक्रम वीरांचा मैदान आहे.गर्दीचे विक्रम इथे होतात तसे खेळाचे विक्रमही येथे झाले. शालेय क्रिकेट मधील मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते ती म्हणजे ‘हॅरिस शिल्ड’ स्पर्धा… या स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांनी 664 धावांची विक्रमी भागीदारी केली ती याच मैदानावर… त्यानंतर या स्पर्धेत पृथ्वी शॉ सरफराज खान यांनी हे विक्रमी खेळी केली. शेतकरी कामगार आशा वर्कर अंगणवाडी सेविका अण्णा हजारेंच भ्रष्टाचार विरोधीच आंदोलन असो किंवा राजकीय पक्षांची एकमेकांविरोधातले आंदोलन प्रत्येक आंदोलनासाठी आझाद मैदान म्हणजे हक्काची जागा… शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन इथेच विसावलेलं होतं आणि राज्यातले अनेक मराठा मोर्चा इथेच विसर्जित झाले होते. बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कारही इथेचं झाले.

स्वातंत्र्यलढा असो किंवा मग अनेक आंदोलनं, क्रिकेट असो किंवा अनेक उपोषणं देशातल्या अनेक राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील घटनांचा साक्षीदार म्हणजे आझाद मैदान… उद्या म्हणजेच 29 तारखेला हेच आजाद मैदान आणखी एका मोठ्या घटनेसाठी साक्षीदार ठरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील उद्या याच मैदानावर धडकणार आहे.

Share This News
error: Content is protected !!