महायुतीतील 18 जागांचा तिढा आज सुटणार?

99 0

राज्यात विधानसभा निवडणुकांचे घोषणा झाली असून आतापर्यंत महायुतीतील भाजपाने 99 शिंदेंच्या शिवसेनेने 45 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 38 उमेदवारांची घोषणा केली. एकूण या तीनही पक्षांनी मिळून 182 जागांची घोषणा केली असली तरी महायुतीमध्ये 18 जागांवरचा तिढा कायम आहे.

अशातच मागील दीड तासापासून केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून या बैठकीत या 18 जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे उपस्थित आहेत.

कोणत्या आहेत या 18 जागा?

  1. अंधेरी पूर्व
  2. दिंडोशी
  3. कलिना
  4. चेंबूर
  5. वरळी
  6. वर्सोवा
  7. शिवडी
  8. धारावी
  9. मीरा-भाईंदर
  10. कोल्हापूर उत्तर
  11. गुहागर
  12. करमाळा
  13. बार्शी
  14. कोपरगाव
  15. गंगाखेड
  16. लोहा
  17. बडनेरा
  18. बाळापुर
Share This News
error: Content is protected !!