छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री का केलं नाही? ; शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा गौप्यस्फोट

57 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत च्या प्रचाराला अवघे सात दिवस शिल्लक असताना प्रचारामध्ये मोठे रंगत येत असून यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री का झाला नाही आणि छगन भुजबळांकडे मुख्यमंत्री पदाची धुरा का दिली गेली नाही याबाबत पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पदाची संधी आली होती मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना अधिक मंत्रीपद घेत मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडं दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदा या मुद्द्याला हात घातला होता या प्रश्नाचे उत्तर आता शरद पवार यांनी दिलं आहे.

2004 मध्ये नेमकं काय झालं होतं?

2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पद का घेतलं नाही असे सहल अजित पवारांनी बोलून दाखवली होती यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की 2004 मध्ये अजित पवारांचा मुद्दाच नव्हता आम्ही अधिक मंत्री पद घेतली त्यावेळी माझे अनेक तरुण सहकारी मंत्री झाले त्यामध्ये आर आर आबा पाटील जयंत पाटील अजित पवार हे तरुण कॅबिनेट मंत्री झाले.

त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचं नाव डोळ्यासमोर होतं

2004 मध्ये सर्वाधिक जागा मिळूनही आम्ही काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद दिले त्यावेळेस सीनियर म्हणून छगन भुजबळ यांचं नाव डोळ्यासमोर होता मात्र छगन भुजबळ यांचा राजकारण तुम्ही पहा त्यांना नंतरच्या काळात तुरुंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिला असता तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!