महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा 230 जागा मिळवत मोठा विजय झाला असून भाजपाच्या या दैदिप्यमान विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे.
भाजपाच्या विजयासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी मोठी भूमिका बजावली मात्र असेही काही नेते होते. ज्यांनी भाजपाच्या विजयासाठी पडद्यामागून मोठी भूमिका निभावली आहे.
यातीलच एक नाव भाजपचे राष्ट्रीय महामंत्री असणाऱ्या शिव प्रकाश यांचं घेतलं जातं.
शिव प्रकाश यांनी बूथची चार कॅटेगरीमध्ये विभागणी केली. A, B, C आणि D यात B आणि C बूथवर जास्त कार्यकर्ते लावून बूथ जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सर्व विधानसभा क्षेत्रातील नाराज आणि प्रभावशाली लोकांची यादी बनवून त्यांच्याशी संपर्क साधून उमेदवाराला मजबूत बनवलं.
कोण आहेत शिवप्रकाश?
शिवप्रकाश हे भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री असून भाजपा येण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते त्यानंतर संघप्रचारक म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.